पारंपरिक रित्या Happy म्हणजे रग्गड पैसा, Class Life Style आणि नशीबवाण असणं असा मानलं जात.

साधारण १४ व्या शतकामध्ये Happy चा इंग्रजी भाषेमध्ये प्रवेश झाला. लोक तेव्हा सक्रियपणे Happy राहण्याचा प्रयत्न करत नव्हते. असं मानलं जात होता कि Happy तुम्ही आहात(काही करणास्तव) तर चांगलंच आहे पण काही कृत्रिम उपाययोजना करून कोणी Happy बनू शकत नाही.

17 व्या शतकापर्यंत हा शब्द समाधान आणि तृप्तीसोबत जोडला जाऊ लागला.

जरी Greeks आणि Romans लोकांनी जगाला आधुनिक शास्त्रीय तत्त्वज्ञानाची ओळख करून दिली असली तरी त्यांनी सुद्धा आनंदाच्या आधुनिक परिभाषेकडे दुर्लक्ष केले आहे. त्यांच्यासाठी, आनंद खरोखरच जीवनाचा प्रमुख उद्देश होता, परंतु त्या शब्दाचा वास्तविक अर्थ काय असावा याची एक वेगळीच परिभाषा होती.

त्यांच्याकडं आनंद म्हणजे एक भावनिक अवस्था म्हणून पाहिला जात नव्हता, आनंदी जीवनाची त्यांची कल्पना आणखी काही गोष्टींवर आधारित होती, तो एक क्षण नव्हता. आनंदाचं नातं आयुष्याशी जोडलं गेलं होतं, जीवनातील कष्ट आणि यातना स्वीकारून जसं जीवन मिळालं आहे तसच जगणं यातच आनंद आहे असं मानलं जात होतं.

आज जर आपण कोणलाही विचारल कि तुम्हाला या आयुष्याकडून काय हवं आहे? तर सर्वात जास्त लोक म्हणतील आम्हाला आनंद हवा आहे. आणि तुम्ही जर त्यांच्या दृष्टीनं आनंद म्हणजे काय याची खोलवर जाऊन चौकशी केलीत तर असे लक्षात येईल कि त्यांच्या दृष्टीनं आनंदी राहणे म्हणजे चांगलं वाटावं(Feel Good), सोईस्कर जीवन असावं आणि शांतता असावी जीवनात अशी अपेक्षा असते.

वरवर पाहता हि अपेक्षा निरागस आणि योग्यच वाटते पण सत्य तर हे आहे कि आनंद मिळवण्याची हि धडपडच त्यांच्या दुःखाचे खरं कारण आहे.

आनंद आणि संतोष हे जीवनातील सर्व समस्यांचे निराकरण आहे आणि एकदा का आपल्याला ते मिळाले तर आपल्याला सर्व काही मिळाले आणि आपल्या जीवनाचं सार्थक झाल अशी समजूत सर्वात चुकीची आणि आणि धोक्याची आहे.

आनंदाव्यतिरिक्त अजून खूप काही आहे जीवनाकडून मिळवण्या सारखं.

मग आनंद का नाही ?

मी स्वत:ला एक खूप आनंदी व्यक्ति मानतो. मी आखलेल्या आनंदाच्या Baseline खाली मी फार कमी आणि खूप दिवसातून जातो. बर्याच कारणांमुळं मी खूप भाग्यवान आहे, आणि त्याबद्दल मी खूप आभारी हि आहे.

माझ्याकडं भरपूर आहे. मला जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याची गरज नाही. प्रसिद्धीचा मला हव्यास नाही. आणि इतरांबरोबर तुलना करणं चुकीचं आहे आणि मी त्यात वेळ वायाही घालवत नाही. आणि माझ्या उर्वरित आयुष्यात मला उगीच नसत्या(गरज नसलेल्या) प्रलोभनांचा पाठलाग करायचा नाही . वास्तवीक गरजांपेक्षा जास्तीचं नकोचय मला.

तरीही मी लिहितो. आणि जेव्हा मी लिहितो, तेव्हा ते दर्जेदारच असायला हवं आणि लोकांना वाचू वाटायला हवं, आवडावं हि माझी सामान्य महत्त्वाकांक्षा आहे.

काही गोष्टी आहेत ज्या कि मला पूर्ण करायच्या आहेत. मी खूप कठोर परिश्रम करतो त्यासाठी आणि नेहमी फक्त मजा आणि मस्ती करत नाही.

पण जर मी आगोदरच समाधानी आहे, तर का हि धडपड?

कारण मला माहित आहे की जर माझ्याजवळ आणखी चांगलं काही तरी करण्याची इच्छा नसेल कोणती अपेक्षाच नसेल, तर मला अपेक्षा पूर्ण केल्यानंतर काही तरी छान केल्यानंतर जे समाधान मिळतं ते मिळणारच नाही.

याचे कारण सोपे आहे. मला आनंद मिळण्याचं मूळ कारण हे नाही की माझ्याजवळ खूप आहे किंवा सर्व काही आहे,
आनंदाच मूळ कारण हे आहे कि मी भरपूर कष्ट केलं आहे माझ्याकडं सगळं काही आहे असं म्हणण्याची वेळ येण्यासाठी आणि त्या परिश्रमाचं फळ मिळालं त्याचामला आनंद आहे.

सर्व काही आयत असणं याचा आनंद आणि सर्व काही स्व-कष्टानं मिळवल्यानंतरचा आनंद यात जमीन अस्मानाचा फरक आहे. म्हंटल तर थोडासाच फरक आहे  पण गंभीर आहे.

मला मिळणारा आनंद हा फक्त मला जे हवं आहे ते मिळवलं म्हणून मिळत नाही तर मला जे काही हवं आहे ते मिळविण्याकरिता ज्या आव्हानांवर मी मात केली आहे त्यातून मिळतो. आणि हे माझ्या अपेक्षा पूर्ण झाल्यामुळे किंवा अपेक्षा काळाबरोबर Readjust केल्यामुळं शक्य आहे.

काही तरी मिळवण्यासाठी मला त्यावर काही काम करण्याची,त्यासाठी कष्ट करण्याची आवश्यकता आहे. जर मी हे कष्ट घेणं त्यासाठी प्रयत्न करणं, धडपडणं सोडलं तर आज जे मिळतंय आणि ज्याचा मला आनंद भेटतोय ते कालांतराने बंद होईल. काही काळानंतर माझी धडपड आणि कष्ट घेण्याची तयारी पण थांबेल, आणि माझ्या जीवनातून हा आनंद नाहीसा होईल. आणि नंतर ती इच्छाशक्ती(धडपड,कष्ट करण्याची) निर्माण करणं केवळ अशक्य होऊन जाईल.

आनंदाच्या या चंचल स्वभावामुळे जीवनात फक्त आनंद असणंच पुरेसं नाही….

नेहमी संघर्ष करणं बरोबर आहे का?

अनेक प्रकारे, मानवांन एकमेकांपासून वेगवेगळे करता येऊ शकतं Biological Alogorithms वरून. जरी हि परिपूर्ण पद्धत नसली तरी हे आपल्या स्वभावा विषयी बरीच माहिती देऊन जाते.

आपण आपल्या ताणतणावानां प्रतिसाद देतो काही तरी Action करून तो दूर करण्याचा प्रयत्न करतो. ताणतणाव हाताळणे हि एक Process बनते आणि काळाबरोबरं आपण ती किती योग्य रित्या हाताळतो यावरून आपण किती चांगलं आणि योग्य रित्या तणावा मधून बाहेर पडतो हे ठरवते. तणाव हाताळणे हि स्वतःमध्येच एक कला आहे. जी फार थोड्या लोकांना अवगत होते काळाबरोबर.

आजच्या या आधुनिक जगामध्ये, आपल्याजवळ बरेच पर्याय उपलब्ध आहेत ज्यांचा वापर करून आपण स्वतःला या ताणतणावापासून मुक्त करू शकतो. आपल्यातील बहुतेक लोक आपल्या जीवनात उभ्या असणा-या खडतर आव्हानांना टाळून(आव्हाहन स्वीकारायचंच नाही) सहज पणे ताणापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात,परंतु असं(पलायन) करणे हे भ्याड पनाचं लक्षण आहे.

तुम्ही तात्पुरता मार्ग म्हणून आपल्या बायकोशी वाद टाळू शकता(खोटं बोलून) किंवा एखाद्या उद्दिष्टप्राप्ती साठी कराव्या लागणाऱ्या कष्टा पासून लांब पळू शकता, परंतु अखेरीस तुमच्या पदरी अस्वस्थता आणि निराशाच पडेल.

एकी कड आपण आनंदाची व्याख्या आपण समाधानि असणे अशी करतो आणि प्रत्यक्षात मात्र कष्ट टाळून आव्हानं टाळून शेवटी असमाधानी बनतो. आपली(मानवाची) उन्नतीच मुळात आहे त्या गोष्टींवर समाधानी राहण्या साठी झालेली नाही. आपण आजच्या प्रगती पर्यंत येऊन पोचलो आहोत तेच मुळात झगडून, आव्हानांचा सामना करून इतर प्राण्यांबरोबर स्पर्धा करून आणि आपण निसर्गतःच झगडण्या साठी आणि स्पर्धा करण्यासाठी evolve झालो आहोत. आपण खूप समाधानी आहोत म्हणून कोणी आपल्याला बक्षिस देणार नाही हा झगडून आणि कष्ट करून मात्र मिळू शकते.

समाजातील काही भागांनी आपल्या या गुणविशेषनांचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग करून घेतला आहे. उदा.काही कॉर्पोरेशन्स आणि उद्योग समूह ठराविक ध्येय गाठल्या नंतर आपल्या नोकर वर्गाला ठराविक बक्षीस देतात आणि पुढील ध्येय प्राप्ती साठी अधिक कष्ट आणि परिश्रम करण्यासाठी प्रोत्साहित करतात. फक्त आहे त्या पगारावर आणि कौशल्यांवर समाधानी राहणे पुरेसं नाही. तुम्ही सतत प्रगती केली पाहिजे जे कौशल्य आहेत त्यात सर्वोच्च, दर्जेदार बनलं पाहिजे. नेहमी समाधानी नं राहता जास्तीची अपेक्षा आणि त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत तरच त्यातून(प्रगतीतून) आनंद प्राप्ती होईल.

याचा अर्थ काही महत्त्वकांक्षांचा आपण पाठलाग केला पाहिजे, थोड्या वेदना सोसायला हव्यात आणि मानसिक स्थिती मध्ये थोडा चढ उतार झाला पाहिजे(सुख दुःख आली-गेली पाहिजेत). अस खूप उच्च किंवा जास्त प्रमाणात करणं हि चुकीचं आहे आणि तो योग्य मार्ग पण नाही पण थोडा चढउतार गरजेचा आहे. स्वतःच्या Comfort Zone मधून बाहेर पडणं गरजेचं आहे. यामुळंच आपल्याला खऱ्या आनंदाचा उपभोग घेता येतो.

काही तरी मिळवण्यासाठी ची धडपच आहे यात समाधानी राहण्या पासून आपल्याला रोखते.

 

तुमचं काय मत आहे ?

आनंद मिळत नाही, तो मिळवावा लागतो. आनंद हे Product नाही, ते Byproduct आहे.

आणि याच कारणास्तव, अशी सर्वसाधारण समजूत आहे कि आनंद, समाधान आणि प्रसन्नतेने मिळवता येऊ शकतो, हे ऐकायला जरी मोहक असलं तरी ही दिशाभूल आहे. परंतु मनुष्याच्या या आयुष्यरूपी जीवनात समाधान आणि प्रसन्नते पेक्षा अजून बरच काही आवश्यक आहे , आणि ते मिळवण्यासाठी सतत प्रयत्नशील असणं गरजेचं आहे.

कृतज्ञता व्यक्त करणं गरजेचं आहे, आणि समाधान प्राप्त करण्यासाठी बाह्य श्रोतांकड आकर्षित होणं साहजिक आहे, पण फक्त मोहक आणि सुलभरीत्या उपलब्ध होणारे श्रोतं पुरेसे नाहीत आयुष्यभराच्या समाधान साठी, खरं समाधान तर संघर्ष पूर्ण आणि प्रेरणा दायक जीवन जगण्यातच आहे.

साचेबद्ध रित्या खाच-खळग्यांवर मात करून मिळणारं समाधन सतत मिळत राहावं अशी जीवनाची ध्येय आणि स्वप्नं स्वीकारण्यातच आहे, आणि हीच गोष्ट आपल्याला दैनंदिन जीवनात जगण्याची नवी उमीद आणि उर्मी देऊन जाते, रोजचा दिवस आपण खऱ्या अर्थानं आनंदी व्यतीत करतो. आणि यातच वेगळे पण आहे.

आपल्या Twilight of the Idols,पुस्तकात Nietzsche लिहतो ,

“ज्याच्याकडे का जगतोय याचं करणं आहे, तो कोणत्याही संकटावर मात करू शकतो”

एखादा चित्रकार एक पैश्या ची हि अपेक्षा नं करता वयाची १० वर्ष कॅनवास समोर सराव करत घालवतो कारण त्याला माहित असतं. Van Gogh च्या एका पेन्टिंग कड पाहत असतांना कसं वाटतं आणि काय फील होतं जे शब्दात व्यक्त करणं कधीच शक्य नाही.

एखादा उद्योजक कित्येक रात्री ना झोपता परिश्रम करत असतो आपलं उत्पादन बाजारात आणण्यासाठी आणि जीवनातील सर्वात मोठा धोका पत्कारत असतो पण हेच त्याला काल पेक्षा आज अधिक चांगले आणि दर्जेदार बनवतं असते.

तुम्ही कोणता मार्ग आणि कोणते ध्येय स्वीकारता हे तुमच्या जीवनात किती अडथळे असती ते ठरवते, आणि तुम्ही ते अडथळे पार करून एक प्रकारचं समाधन मिळवता आणि त्यालाच खऱ्या अर्थानं जीवनात महत्व आहे.

तुम्ही आव्हानात्मक जीवन जगण्याचा पर्याय निवडाल तर आनंद तुम्हाला कधीच पुरेसा वाटणार नाही कारण तुम्ही त्यापेक्षाहि किती तरी पटीनं चांगलं काही तरी मिळवत असतां. आणि हेच तुमची मानसिक शांतता मिळवण्याचा प्रमुख साधन असेल.

हा दर्जेदार लेख आवडला असेल तर आपल्या दर्जेदार नातलग आणि मित्र मंडळींना नक्की शेअर करा…..

 तुम्ही हे वाचलं आहे का?

  1. एलोन मस्क – एक असामान्य व्यक्तिमत्त्व (Real world Iron Man)
  2. इलेक्ट्रिक बाईक समज, आणि गैरसमज