1. नको असलेल्या गोष्टींचा पाठलाग करू नका.

मला माहित आहे की हे किती दुःखदायक वाटतं जेव्हा आपण एखादी गोष्ट तळमळीनं मिळवण्याचा प्रयत्न करतो पण ती मिळत नाही. ज्या व्यक्तीला आपण दोन वेळा Date वर घेऊन गेलो ती अचानक पणे आपल्या फोन ला आणि मेसेजेस ला उत्तर देणं बंद करते(टाळते). दर्जेदार चार Interview चे राऊंड होऊन देखील पण कंपनी आपल्याला Job ची Offer देत नाही.

खुप दुःख, खुप दुःख होतं आणि प्रत्येकाच्या आयुष्यात अशी परिस्थिती केव्हा तरी येतेच.

तुम्ही या दुःखाला विसरून पुढं जाता कि त्याच त्याच गोष्टींचा पुन्हा पुनः विचार करून स्वतःला त्रास(Heart) करून घेता यावरून तुम्ही स्वतःवर प्रेम करता कि करत नाही हे कळतं.

 

2. डोळे उघडून पहा स्वतः कड

दुसऱ्या कोणी तरी आपल्याला त्रास देणं आणि आपण स्वतःहून स्वतःला त्रास करून घेणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.

जेव्हा आपण आपल्याला आवडत नसलेला जॉब(Job) करतो, आवडत नसलेले अन्नपदार्थ खातो, आवडत नसलेल्या ठिकाणी राहतो, नं आवडणाऱ्या व्यक्तीबरोबर नाइलाजास्तव Time Spend करतो, आज दिवसभर काय करायचं याविषयी स्वतःचं असं काही मत नसतं, आत्ताची परिस्थिती सुधारण्यासाठी काही Plan तयार नसतो आणि आपलं ध्येय आपण Find Happiness असं काल्पनिक शब्दात व्यक्त करतो. आपण स्वतःवर प्रेम करत नसतो. 

आणि आपण जेव्हा आपल्या जबाबऱ्या नक्की काय आहेत, कर्त्यव्य काय आहेत याची बारकाईनं शहानिशा करतो तेव्हा लक्षात येत कि आयुष्याची घडी पुर्ण बिघडलेली आहे, अपेक्षेप्रमाणे काहीच नाही चाललेलं.

मला माहिती आहे, तुम्हाला हे शुल्लक आणि वायफळ वाटेल, तुम्ही याकडं सहज दुर्लक्ष कराल. महिन्याचं मोबाईलचं बिल भरता येतंय ना मग पुष्कळ आहे, सगळं ठीक चाललंय असं वाटेल. पण तुमचं अंतर्मन काळजीनं पोखरून निघालेलं असेल, आत्मसम्मान ढासळलेला असेल.

जेव्हा तुम्ही सगळं ठीक करायचा प्रयत्न करायला निघाल, आयुष्याची घडी परत नीट बसवायला निघाल तेव्हा तुमचा आत्मसम्मान जागृत होईल, स्वतःची कपडे स्वतः धुण्यात पण तुम्हाला वेगळीच मज्जा येईल, आनंद मिळेल. आणि तेव्हा तुम्ही आपोआपच स्वतःवर प्रेम कराल.

3. फक्त बोलून दाखवण्या पेक्षा कृती करा

स्वत:वर प्रेम करण्याची मानसिकता काही तरी कृती केली तरच निर्माण होते फक्त बोलल्याने नाही

फक्त बाथरूम मधल्या काचेवरील स्वतःच्या प्रतिमेकडं पाहुन “I’m the best” असं जोरात ओरडुन किंवा वाफाळलेल्या आरश्यावर “I’m the best” असं लिहून काही होतं नसतं. The Best बनण्यासाठी काही तरी कृती करण्याचीच गरज आहे ना कि फक्त बडबड करण्याची.

“हा हे बरोबर आहे कि आपलं सर्वोत्तम काम करण्याआधी किंवा आपल्यातलं सर्वोत्तम बाहेर काढण्यासाठी आपण सक्षम आणि सर्वोत्तम आहोत असा विश्वास हवा. पण माझ्या मते त्याआगोदर आपण स्वतःला सर्वोत्तम बनवण्यावर कार्य करण्याची (कधीकधी खुप कष्ट घेणं) गरजेचं आहे. आणि हे स्वतःवर प्रेम केल्यानेच शक्य आहे. आरोग्याकडं दुर्लक्ष करून किंवा स्वतःच्या कौशल्य वृद्धीकडं दुर्लक्ष करून हे शक्य नाही. तुम्ही असा नाही विचार करून जमणार कि सगळं साध्य झाल्यावर स्वतः विषयी विचार करू. मग स्वतःवर प्रेम करू. पाहिलं स्वतःवर प्रेम हवं”

४. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या.

दररोज मद्यपान करणे, तंबाखू, मावा असे शरीराला अपायकारक असणारे पदार्थ खाणे म्हणजे स्वतःवर प्रेम करणे असा नाही होतं.
अश्या व्यक्ती नकळत पणे स्वतःचा तिरस्कारच करत असतात, स्वतःवर प्रेम नसतेच त्यांचे…

कधीच कसरत नं करणं म्हणजे स्वतःवर प्रेम नं करणं , जीवनसत्व आणि प्रथिनं उक्त अन्न पदार्थ नं खाणं म्हणजे स्वतःवर प्रेम नं करणं असाच होतो. तुम्ही जसे आहेत तसेच स्वतःवर प्रेम करा. चांगल्या सवयी असणं चांगलाच आहे कि…

It’s about caring enough about yourself to take care of yourself.

उत्तम आणि दर्जेदार शरीरयष्टी असणं हे निरोगी आणि स्वतःवर प्रेम करणाऱ्या व्यक्तीच उदाहरण आहे. पण त्या साठी Long Term गुंतवणूक करावी लागते आरोग्यामध्ये.

५. कारणे देणं बंद करा.

स्वतःची प्रथम काळजी घेणं म्हणजे स्वार्थी पणा होतं नाही. आणि स्वतःवरील प्रेम हे वाईट वागणूक किंवा वाईट सवयीच कारण कधीच होऊ शकत नाही.

“तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करता,आदर करता,ज्या व्यक्तीचा गर्व बाळगता त्या व्यक्तीसारखं बनण्याचा प्रयत्न तुम्ही करता किंवा करायला हवा तीच खरं तर स्वतःवर प्रेम करण्याची पायरी असेल. स्वतःशी प्रामाणिक राहून विचार करा तुम्ही ज्या व्यक्तीचा आदर करता त्यांच्या सारखं बनण्याचा विचार मनात असतो पण सोबत हे हि माहिती असतं कि तसं बनण्यासाठी मला खुप कष्ट आणि मेहनत घ्यावी लागेल आणि याच धारणेतून तुम्ही आपल्याला ते शक्य नाही असं म्हणून ते टाळून पुढं निघून जाता.”

पण निश्चयी स्वभावाच्या व्यक्ती ध्येय गाठूनच शांत बसतात..स्वतःला निश्चयी बनवा…स्वतःवर प्रेम करा..तरच तुम्ही दुसऱ्याला प्रेम देऊ शकाल.

स्वत: ला प्रेम म्हणजे आयुष्याच्या या धावपळीत स्वत: ची काळजी घेणे (शारीरिक मानसिक आणि वैचारिक काळजी)- आणि त्याच बरोबर आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीवर प्रेम करणं आणि त्यांची काळजी करणं.

थोडक्यात

स्वतः प्रेम करणे हे दुसऱ्या कोणावर प्रेम करण्यासारखेच आहे. पण तुम्ही स्वतःवर प्रेम करू शकत नसाल तर तुम्ही तुमच प्रेम इतरांना काय द्याल………… म्हणूनच स्वतःवर प्रेम करायला शिका.

 

तुम्ही हे वाचलंत? नक्की आवडेल.

* जीवनाचं ध्येय फक्त आनंद (Happyness) मिळवणं नाही.
* एलोन मस्क – एक असामान्य व्यक्तिमत्व

 

(Photo Courtesy: unsplash)