अपयश हि यशाची पहिली पायरी आहे असं म्हणतात पणं खरं सांगायचं तर माझी आणि अपयशाची अजून ओळख झालीच नाही, मी यशालाच अजून मोठ्या यश संपादनासाठी पहिला पायरी बनवलं आणि एकापाठोपाठ एक अश्या ७(Including Internship) कंपन्यांमध्ये Interview देऊन Crack हि केले… काय वेगळं केलं मी इतरांपेक्षा?

दोन शब्द माझ्याविषयी

ऑफर्स कश्या मिळवल्या याविषयी सविस्तर सांगण्या-पूर्वी माझी थोडक्यात ओळख करून देतो.
मी सुहास नवरोसजी वाडिया कॉलेज येथे Computer Science या विषयात Masters डिग्री घेत असताना एका नामांकित IT कंपनी मध्ये इंटर्नशिप साठी सिलेक्ट झालो आणि ६ महिन्यानंतर इंटर्नशिप संपल्यानंतर त्याच कंपनी मध्ये Jully २०१७ पासून Software Engineer या पदावर कार्यरत झालो .
Software Engineer म्हणून जबाबदारी सांभाळत असताना मी मिळणाऱ्या मोकळ्या वेळेत काही पर्सनल प्रोजेक्ट्स वर काम केलं आणि प्रोफेशनल कामाव्यतिरिक्त मी काही नवीन टेकनॉलॉजि आणि प्रोग्रामिंग language शिकलो.
वाचनाची आवड तर पहिल्यापासूनच होती ती फक्त चांगल्या करिअर साठी आवश्यक ज्ञान ग्रहण करण्यात आणि करिअर रिलेटेड वाचन करण्यात फोकस केल. आणि याच आवडीचा आणि Passion चा उपयोग मला सलग ६ Interview crack करण्यासाठी झाला.
हि पोस्ट लिहीत असताना माझ्या हातात ६ वेगवेगळ्या IT कंपन्यांकडून वेगवेगळ्या ऑफर्स आहेत.

पहिल्या कंपनीला Apply करण्यापूर्वी

निरंतर वाचन, वाचन आणि फक्त वाचन…
पहिल्यापासूनच मला मी ज्या गोष्टींवर काम करतोय त्या गोष्टींविषयी मला पूर्णतः (Inside-Out) माहिती असणं मी गरजेचं समजतो. आणि हीच गरज(Curiosity) एक ना अनेक गोष्टींवरून पडदा उठवते आणि नक्की गोष्टी कश्या वर्क होतायत हे समजवायला मदत करते.
मी निरंतर वाचनात दंग होतो, मिळेल त्या ठिकाणावरून मिळेल ती माहिती संकलित करीत होतो. Medium, Hacker News आणि अशे विविध ब्लॉग आणि संकेत स्थळांचा मी दररोज वापरकर्ता झालो होतो, मी रोज मिळेल त्या मोकळ्या वेळेत वाचत होतो.

साधारण एक महिन्यानंतर माझ्या लक्षात आल कि माझी नव-नवीन गोष्टी शिकण्याची आणि जाणून घेण्याची भूक फक्त वाचनावर शमणार नाही, मला Challenging आणि मनाला समाधान देणाऱ्या कामाची गरज होती… जे मी सध्या काम करत असलेल्या कपंनी मध्ये पण मिळत होतंच पण माझी भूक आत्ता वाढली होती आणि म्हणूनच मी खूप विचार पूर्वक काही नवीन कंपन्यांमध्ये माझा Resume पाठवून कामाची विचारणा करू लागलो.

पहिली कंपनी,पहिला Interview आणि पहिली ऑफर

माझ्या दृष्टीनं मला जिथे Challenging काम भेटू शकेल, नवं-नवीन गोष्टी आणि Technologies शिकण्याची संधी मिळेल, माझ्या Curios स्वभावाला वाव मिळेल अश्या ठिकाणी मी Apply करायला सुरवात केली.

आणि पहिल्याच प्रयत्नात Interview Schedule झाला आणि अर्थात मी तो Crack हि केला. मदत झाली ती पुन्हा माझ्या वाचनाची आणि फावल्या वेळात मी केलेल्या माझ्या Personal Projects ची.

Interview Schedule होण्यासाठी मात्र माझा Resume कामी आला. मी Graduation आणि Post-Graduation करत असताना वेगवेगळ्या प्रोग्रामिंग स्पर्धा जिंकलो होतो, त्यातील दोन स्पर्धा National Level च्या होत्या आणि त्या जिंकल्यामुळे मी वर्तमान पत्र मध्ये हि झळकळों होतो.
एकंदरीत माझा Resume Strong होता जो हजारो Applicants मधून मला वेगळं करत होता आणि माझा Interview लगेच schedule होत होता. असा आहे माझं Resume 

पहिली ऑफर मला ३.८ LPA ची मिळाली अर्थात मिळणारा पगार हि गोष्ट माझ्यासाठी गौण होती माझे Deciding Factor हे पैसे आणि Incentive या पलीकडचे होते. मला खात्री होती आणि Interview Process मध्ये मला जाणीव झाली होती कि मला जे Challenging Kaam हवं आहे ते मला इथं नक्की भेटेल. आणि मला माझी क्षमताही लक्षात आली होती अनुभव नसतानाही मी माझ्या Knowledge च्या जोरावर नवीन कंपनी मिळवू शकतो हे लक्षात आलं होतं. कंपनीच्या खुद्द M.D ने मला पूर्ण ऑफिस फिरून दाखवलं मला आश्वासन दिलं कि तू जे शोधतोयस ते तुला नक्की भेटेल इथं आणि मला त्यांचीच कंपनी Join करण्यासाठी Motivate केलं. कदाचित त्यांनाही माझी क्षमता लक्षात आली असावी आणि म्हणूनच ते जी ऑफर साधारण १-२ वर्ष अनुभवी लोकांना देत होते ती मला देऊ केली.

अमूल्य सल्ला

सध्या काम करत असलेल्या कंपनी मध्ये मी लागलीच Resignation Letter टाकलं आणि दोन महिन्यांचा नोटीस पिरियड चालू झाला.. म्हणजे मला पुढचे दोन महिना हि कंपनी सोडता येणार न्हवती… अर्थात काही ठिकाणी हे लवकर हि Relieving Letter देतात पण मी ज्या प्रोजेक्ट वर काम करत होतो त्याची Release Date जवळ होती आणि माझा Role Important होता Project Release प्लॅन च्या दृष्टीनं.
मी नवीन कंपनी जॉईन करण्याची प्रतीक्षा करत असताना मला काही सिनियर मित्र मंडळींनी ज्यांना मी कश्या प्रकारच काम आणि वर्क Environment मध्ये काम करायची इच्छा बाळगतो हे माहित आहे त्यांनी मला स्टार्टअप कंपनी मध्ये तुला तुझ्या अपेक्षे प्रमाणे काम मिळेल असा सल्ला दिला आणि मी जरासा हि वेळ न दवडता Specifically Start Up कंपन्या मध्ये Apply करायला लागलो.

दुसरी कंपनी आणि दुसरी ऑफर

स्टार्टअप कंपनी मध्ये मला Challenging आणि Front End – Backend वर काम भेटेल जबाबदारी मोठी भेटेल या अपेक्षे पोटी मी फक्त स्टार्टअप कंपनीना Apply करत होतो.

दुसरा Interview Schedule झाला अपेक्षेपेक्षा खूपच खडतर गेला पण हाही Interview मी Crack केला.
पण कंपनी तुलनेनं छोटी आणि Initial Phase मध्ये असल्या कारणानं त्यांनी ३.२ ची ऑफर देऊ केली.मला याऊर्वीच ३.८ ची ऑफर असताना देखील 
पण तरीही मी हि कंपनी जॉईन करण्यासाठी तयार होतो कारण मला काम Go प्रोग्रामिंग वर भेटणार होतं आणि माझ्या दृष्टीनं Go येणाऱ्या काही दिवसात आणि आत्ताही Hot and Emerging टेकनॉलॉजि आहे आणि मला इच्छा आहे कि मी ती शिकावी आणि त्यावर काम करावं.
पण नंतर मला तिसरी ऑफर अशी मिळाली कि मी ती नाकारू शकलो नाही.

तिसरी कंपनी आणि तिसरी ऑफर

तिसरी ऑफर पण मला एका स्टार्टअप कंपनी कडून मिळाली ज्यात त्यांनी मला AI आणि Machine Learning वर 

काम देण्याची ऑफर दिली जो कि माझा Core इंटरेस्ट आहे सोबतच मला ६ महिन्यांच्या सर्व्हिस नंतर कंपनी मध्ये काही शेअर्स देण्याचा आश्वासन हि दिलं पणं का कुणास ठाऊक मला एवढी छान आणि चांगली ऑफर असतानाही माझं समाधान होत न्हवतं.
आणि मी पुन्हा New Opportunities च्या शोधात निघालो.
हे Interview Crack करत असताना आणि करण्या साठी मी अहोरात्र वाचन आणि अभ्यास करत होतो हे मात्र विसरू नका..

चौथी कंपनी आणि चौथी ऑफर

चौथी हि ऑफर मला अश्या स्टार्टअप कंपनी कडून मिळाली ज्याचं Revolutionary Product होतं आणि मला Key Role ऑफर केला होता, माझी इच्छा आणि Capacity लक्षात घेऊन CEO ने मला आग्रह आणि माझ्या कडून खात्री करून घेतली होती कि मी नक्की त्यांनाच जॉईन करेल/करावं म्हणून.
पण तरीही मी समाधानी झालो नाही … आणि मी माझं वाचन आणि अभ्यास चालूच ठेवला . आणि पुन्हा नवीन कंपनीच्या शोधात निघालो

पाच नंबरची ऑफर आणि सहा नंबर ची कंपनी

पाच नंबरची ऑफर मी स्वीकारली नाही. आरोग्य क्षेत्रात काम करणारी हि स्टार्टअप कंपनी खूप नामांकित आणि मोठी होती ऑफर हि त्यांनी ५ LPA ची देऊ केली होती अर्थात selection झाला होत पणं मला काही नेगेटिव्ह गोष्टी कानावर पडल्या जसं कि Managment चा एम्प्लॉयीस बरोबर चा अमानुषकी व्यवहार, अचानक किंवा विनाकारण कामावरून काढून टाकणे अश्या गोष्टी…
मला माझ्या कामावर आणि हार्ड वर्क वर पूर्ण विश्वास होता आणि आहे आणि जरी मी ती ऑफर स्वीकारली असती तरी माझ्यावर अशी वेळ नक्कीच ओढवली नसती याचा विश्वास होता पण माझं Inner Voice मला नको स्वीकारूस हि ऑफर असा ओरडून सांगत होत आणि मी सवाई प्रमाण माझ्या आतल्या आवाजाचंच ऐकलं आणि हि ऑफर नम्रतेनं अस्वीकार केली.

सहा नंबरच्या कंपनी कडून मी माझी पाच नंबर ची ऑफर घेतली खर पणं मी ऑफिस मधून बाहेर पडत असतानाच ठरवलं होता कि I am not going to join this company. का कुणास ठाऊक पण मला नको वाटलं.

सहावी आणि शेवटची ऑफर

मी मुद्दाम पहिल्या पाच ऑफर आणि Interview Process विषयी सविस्तर चर्चा नाही केली कारण मला या Interview आणि कंपनी विषयी सविस्तर सांगायचं होत. कारण मी हीच कंपनी जॉईन करणार आहे.

एक रविवारी दुपारी मला एका अनोळखी नंबर वरून कॉल आला आणि मला अस सांगण्यात आल कि त्यांना माझं Profile आवडल आहे (खर तर वरील सर्व कंपन्या देखील असच म्हणाल्या होत्या) आणि ते मला Interview साठी बोलावू इच्चीत होते.
३१ डिसेंबर असताना आणि सुट्टीचा दिवस असताना देखील मी तयारी दर्शवली आणि ३ वाजता Interview ची वेळ निश्चित झाली.
तब्बल २ तास आणि ३० मिनिटे Interview चालला आणि वरील सर्व Interview पेक्षा हा वेगळा होता. Interview घेणारे त्या कंपनी चे Founder आणि CEO होते. ना-ना तर्हेचे प्रश्न विचारून त्यांनी माझी चाचपणी केली माझी हार्ड वर्क करायची तयारी आहे का नाही यापासून ते मला काय Motivate करत Weekends Sacrifice करायला इथपर्यंत तपासणी झाली. एकदम बेसिक प्रश्नांपासून ते एकदम लेटेस्ट कन्सेप्ट त्यांनी मला किती येतो आणि समजलंय का  हे जाणून घेतलं. आणि अखेरीस मला एक टास्क दिलं जे मला २ आठवड्यांमध्ये पूर्ण करायच होत.
मी ते ४ दिवसात पूर्ण करून जमा केलं आणि माझा दुसरा Interview घेण्यात आला अर्थात त्यांना मी केलेला Code आवडला होता आणि म्हणूनच दुसरा राऊंड घेण्यात आला.
या Round मध्ये मी केलेला Code नक्की मीच केला आहे का याची खात्री आणि नंतर मी किती डेडिकेशन देण्यासाठी तयार आहे याची तपासणी केली गेली.

आणि मी मुळातच या आणि अश्याच कामाच्या शोधात होतो. कंपनी चे mentor Google चे एम्प्लॉयीस आहेत जे फक्त ४ तासांच्या मिटिंग साठी १.२ करोड घेतात यावरून त्यांचं ज्ञान आणि क्षमता लक्षात येते.

मला ते CEO आणि Founders खूपच आवडले त्यांचं Genuine स्वभाव आणि Interview मधल्या मन मोकळ्या गप्पा त्यांचं ते जे प्रॉडक्ट वर काम करतायत त्यावरील प्रभुत्व आणि Future मधल्या Opportunities माझ्या दूरदृष्टीने वेधल्या आणि मी मनोमन हीच कंपनी जॉईन करण्याचा निश्चय केला.

त्यांची ऑफर देखील नाकारता येण्यासारखी न्हवती ४.५ LPA आणि अवघ्या ५ महिन्यानंतर ६ LPA पेक्षा जास्त देण्याच आश्वासन याबरोब्रर मी शोधत असलेल Challenging काम आणि Expected Work Environment मिळालं.
सोबत Free लंच आणि breakfast आणि बराच काही पण या गोष्टींपेक्षा मला खर तर Founders भावले. मला माझा Mentor असाच एखादा व्यक्ती असावा अशी इच्छा होती.

अश्या लोकांच्या सानिध्यातच मी माझी वैयक्तिक प्रगती करू शकतो आणि माझा Code असा व्यक्ती Review करणार आहे जो ४ तासांच्या मिटिंग साठी १.२ करोड घेतो आणि Flip**rt आणि Snap***l सारख्या कंपन्यांच्या CEO ला तुझी वेबसाईट आणि बिसनेस मॉडेल 3rd क्लास आहे असा सांगतो. म्हणजे मी किती आणि काय Standerd चा Code करण अपेक्षित असेल याची कल्पना करता येईल. आणि या आणि अनेक कारणांमुळं मी हीच कंपनी जॉईन करण्याचा निश्चय केला.

मानवी स्वभाव – तरीही असमाधानी

एवढी छान ऑफर असून देखील मी अजूनही शोधातच होतो .पण खरं तर आत्ता मला क्षणभर विश्रन्तीची गरज होती. क्षणभर विश्रांती अश्या साठी म्हणालो कारण गेली कित्येक दिवस मी अहोरात्र अभ्यास आणि प्रोजेक्ट्स वर काम करत होतो.प्रत्येक स्टार्टअप कंपनी Hiring Process चा भाग म्हणून काही अँप्लिकेशन्स आणि टास्क करायला सांगत होती जे पूर्ण करत असताना माझी सर्व शक्ती पणाला लागत होती, आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर मी त्या वेळे अगोदर पूर्ण करत होतो, कित्येक Weekends आणि माझा Free Time मी अभ्यास आणि नवीन टेकनॉलॉजिस शिकण्या मध्ये व्यतीत केले होते. Social Media पासून फारकत तर फार पूर्वीच घेतली होती, जे काही मित्र मैत्रिणी कॉन्टॅक्ट मध्ये होते त्यांच्याशी Automatic च संपर्क कमी झाला होता. पै-पाहुणे थकले होते घरी बोलावून बोलावून पणं मी काही या गोष्टींना वेळ दिला न्हवता. आणि सतत वाचन आणि काही तरी शिकण्याची आत्ता सवयच लागली होती, २ मिनिट सुद्धा वायफळ घालवायला मन तयार होत न्हवतं.
आणि माझी हि मनस्थिती माझ्या जवळच्या मित्रांच्या लक्षात आली आणि माझ्या एका Social Worker मैत्रिणीने जी मानसिक स्थिती आणि आजारांवर Consult करत होती तिने सल्ला दिला कि आत्ता थोडा रिलॅक्स हो…. स्वतःला वेळ दे आणि दैनंदिन रूटीन मध्ये बदल कर..
आणि सुदैवाची गोष्ट अशी कि पुरतं वाचन असल्यामुळं माझ मानसिक आरोग्य बिघडत चाललंय हे माझ्या हि लक्षात येत होतं मी स्वतःला वेळ देत नाही, झोप पूर्ण घेत नाही या गोष्टी लक्षात आल्या होत्या…
आणि म्हणूनच मी थोडी विश्रांती घेतली.. सगळ्या मित्र मैत्रिणीनंबरोबर पुन्हा कॉन्टॅक्ट चालू करणार आहे अर्थात सगळे चिडले आहेत ..त्यांनाही मी माझी हकीकत सांगणार आहे .. आणि मला खात्री आहे कि ती नक्की समजून घेतील मला …हे लिहण्याच एक कारण हे हि आहे..

सारांश

प्रत्येक गोष्टीची एक ठराविक किंमत असते, या जगात काहीच Free मिळत नाही. आणि काही मिळवण्यासाठी त्या गोष्टीची किंमत ही मोजावीच लागते.

अवघ्या ६ महिन्याच्या एक्सपेरिअन्स वर पगारात ५०% Hike मिळवणं आणि सलग ७ Interview Crack करणं, एकदाही असफल न होता. या क्षमतेचा बनण्यासाठी मी एक किंमत मोजली,
क्षणिक सुखांवर पाणी फेरलं, मित्र-मैत्रिणींचा संपर्क कमी झाला, पै-पाहुण्यांशी संपर्क कमी झाला, पूर्ण वर्ष भरात कुठेच फिरायला जायला जमलं नाही आणि बराच काही.
आणि मला वाटतं हि किंमत मोजल्याशिवाय मी जे Achieve केलं ते केवळ अशक्य होत. किंवा मला समतोल साधता आला नसेल कदाचित पणं काही तरी मिळवण्या-साठी काही तरी Sacrifice  करावंच लागत हे मात्र मी नक्की जाणून आहे.

मी माझे Weekends, Friends आणि Time केला तुम्हाला दुसरं काही करावं लागेल. पण Sacrifice तर नक्की करावं लागेल हे नक्की.

अजून दोन शब्द

मी म्हणालो कि काही तरी मिळवण्या साठी काही तरी गमवावा लागत म्हणजे मला चांगल्या पगाराची नोकरी मिळवायची होती किंवा Challenging काम मिळवायच होत असं बिलकुल नाही.
मला जे मिळवायचा आहे ते तर आत्ता कुठं दृष्टीक्षेपात आलं आहे. आणि जे दृष्टीक्षेपात आलं आहे त्यापर्यंत पोचण्यासाठीची जे मिळवलं ती एक पायरी होती.

मी जे माझ्या मित्र – मैत्रिणींपासून अलिप्त राहिलो तो दुरावा दूर करून आणि वर्क-लाइफ बॅलन्स साधून म्हणजे सगळ्यांना time देऊन मला बिघडलेली घडी पुन्हा बसवायचीय.. आणि त्यासाठी आणि स्वतःसाठी थोडा आराम करून मी पुन्हा नव्या उमेदीनं आणि ताकदीनं दृष्टीक्षेपात आलेलं माझं ध्येय सगळ्यांच्या सोबत राहून आणि सगळ्यांना वेळ देऊन आणि माझं मानसिक आरोग्य सांभाळून कवेत घ्यायला निघणार आहे…

म्हणजे पिक्चर तो अभि बाकी है मेरे दोस्त…..;-)

 

हा दर्जेदार स्वानुभव आवडला असेल तर आपल्या दर्जेदार नातलग आणि मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा…

 

खरं तर इथं मी ऑफर्स कश्या मिळवल्या आणि नक्की काय केलं त्या मिळवण्या साठी याविषयी काहीच बोललो नाही.
पण नक्कीच पुढील पोस्ट मध्ये त्याविषयी सविस्तर बोलेन.