“The information we consume matters just as much as the food we put in our body. It affects our thinking, our behavior, how we understand our place in the world. And how we understand others.” — Evan Williams, Co-Founder of Twitter and Medium”

 

 

या क्षणी कुठे तरी एक वाक्य, एक समास, एक लेख, एक ग्रंथ असा आहे जो वाचल्यावर आपलं आयुष्य जसं पूर्वी होतं तसं राहणार नाही. जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलून जाईल. अशा प्रकारच्या लेखनाला Eureka लेख असं संबोधलं जातं जो वाचल्यावर आपली वैचारिक प्रगती होते आणि अश्या प्रकारचे लेख, ग्रन्थ वाचण्या साठी मिळवणे हे आजच्या Fake, वायफळ माहितीने Overload झालेल्या आधुनिक जगात मिळवणे हे एक आत्मसात करण्यायोग्य कौशल्य आहे.

आपण सर्वानी कधी तरी आपल्या आई-वडील, शिक्षक, पालक किंवा आदर्श, यशस्वी व्यक्तीकडून कडून ऐकल असेल कि अमुक एक book वाचल आणि माझ आयुष्य पूर्ण बदलून गेलं. तो लेख, ते Book अचानक धक्का देऊन जात आणि आपण खडबडून जागे होतो.

उदाहरणच द्यायचा झाला तर Warren Buffett यांचं Eureka Book होतं The Intelligent Investor जे त्यांनी वयाच्या १९ व्या वर्षी वाचलं या Book मध्ये Investment ची पायाभूत समीकरण उलगडली आहेत जी Buffet यांनी आयुष्यभर Follow केली. Elon Musk साठी The Hitchhiker’s Guide to the Galaxy हे बुक कलाटणी देणारं ठरलं जे Elon च्या एक वक्त्यव्यानुसार त्याला जगातील मोठ्या आणि कुटील समस्यांना तोडगा काढण्यापूर्वी मोठे प्रश्न विचारण्याची उर्मी देऊन गेलं. माझ्या साठी काही दिवसांपूर्वीच वाचनात आलेलं Don Norman यांचं Living with complexity आणि The Design Of Everyday Things हे Eureka moment ठरले(मी समजतोय तरी तसं).

अशे Eureka Books rare असतात पण हे अशे एक एक Books हजारो बऱ्या बुक्स पेक्षा किती तरी पटीनं दर्जेदार असतात.
ते वाचल्यानंतर त्यांचा परिणाम कदाचित काही क्षणा करिताच राहू शकतो पण हे बुक्स आपल्यावर आयुष्यभराची छाप पाडून जातात.

आत्ता विचार करा कि हे अशे अनुभव जर आपल्याला कित्येक वर्षातून एकदा किंवा वर्षातून २-३ वेळा येण्या ऐवजी महिन्यातून ४-५ वेळा आले तर..आपलं आयुष्य बदलून जाईल, आपण वैचारिक प्रगतीच्या अश्या टप्पयावर पोहचू कि जिथून तमस आणि रजस गुण एकमेकांना पूरक वाटतील, उच्च आणि नीच असा भेद मनात राहणार नाही, आणि सुरवात हाच शेवट आहे हे पटायला लागेल, अनादी मी अनंत मी अवध्य मी भला वाटायला लागेल.

पण अशी बुक्स किंवा लेख फार कमी प्रमाणात आढळतात, आणि ते शोधणे हे पण मोठं कष्टाच काम आहे.
मग एक अत्यंत मार्मिक प्रश्न उपस्थित होतो.

 

How do we use the limited time we have to find breakthrough knowledge in a sea of distraction?

काही लोकांनीं हजारो बुक्स वाचून काढलीत शिस्त बद्ध पद्धतीनं अगणित आणि अपरंपार माहितीसाठा गोळा केली. माझ्या पण बुक शेल्फ वर शंभर सव्वाशे बुक असतील, माझं Amazon kindle, ऑडिओबुक्स, Wish List अशी एकत्रित साधारण शे-पाचशे बुक असतील जी मला आवर्जून वाचायची आहेत. पण वेळच नाही हि अगणित Wish List मधली बुक्स वाचायला. आणि Wish List तर दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
दररोज सर्वसाधारण व्यक्तीवर हजारो इन्फॉर्मटिक व्हिडीओ, ब्लॉग पोस्ट, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, इ-बुक्सआणि इ-न्युज पेपर यांच्या माध्यमातून Infinite माहितीचा मारा केला जातो (Thanks to infinite scrollbar feature). यातलं काय Consume करणार आणि काय टाकून देणार?
हा इन्फॉर्मशनचा ओव्हरलोड हॅन्डल करण्यासाठी गेल्या काही काळापासून जगातील यशस्वी उदयोजक(Including Elon Musk), आंतराष्ट्रीय विचारवंत आणि राजकारणी(S. Pawar) यांचं निरक्षण करून एक दृष्टिकोन विकसित केला आहे.

पण या निरीक्षणावर बोलण्या अगोदर आपण नक्की प्रॉब्लेम काय आहे ते समजून घेतलं पाहिजे.

As inventor Charles Kettering once said, “A problem well-stated is a problem half-solved.”

 

The Four Horsemen of the Info-Apocalypse

सुरवातीच्या वक्त्यव्यावरून जरी Information Overload ही मुख्य अडचण वाटत असली तरी प्रत्यक्षात त्यात छुप्या चार मुख्य अडचणी आहेत.
अगणित Information Available असल्यामुळे ज्याला खरोखरच वाचकांचं Attention मिळायला हवं ते भेटत नाही आणि Information Overload मुळ वाचकांनाही वाचण्या योग्य Resource लवकर भेटत नाही. याला सध्या भाषेत Content Shock असं म्हणता येईल. म्हणजेच Knowledge तर भरपूर Available आहे Consume करण्यासाठी. पण प्रत्यक्षात मात्र Consumtion Rate कमी आहे. Knowledge Availablity चा आलेख चढता तर Knowledge Consumtion चा आलेख समांतर आहे.

 

Info-Apocalypse Problem 1: Content Shock

A wealth of information creates a poverty of attention …” ―Herbert A. Simon

आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रगती मुळ, सोशल मीडिया आणि तत्सम ऑनलाईन प्रकाशनामुळं Ammount ऑफ Available Knowledge To Us प्रचंड प्रमाणात वाढत आहे. इतकी कि आपण ती Comsume करू शकत नाही. आणि एकीकडं प्रत्येक सेकंदाला कोणी तरी एक नवीन लेख लिहून आपले विचार प्रकट करत आहे .
(मातृभाषा मराठी असूनही कधी कधी नाही जमत मराठीत व्यक्त व्हायला)

The problem: Much new information and many new skills we could learn are out there, but they’re so buried that we don’t even know they exist and even if somehow we get to know them we are so much distracted by things(FB, WhatsApp, Instagram and all) that we don’t get a chance to have a look on them.

 

Info-Apocalypse Problem 2: Echo Chambers

कालांतराने लोक आप-आपला एक वेगळा गट निर्माण करतात आणि प्रत्येक गट स्वतःला आपण एकमेकांपासून कसे भिन्न आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतो. गटा-गटात मतभेद आणि दरी वाढत जाते आणि एक गट दुसऱ्या गटा बरोबर Information Share करण्यास नकार देतो यातूनच मग प्रत्येक गटाचं स्वतःच वेगळं Cultural तयार होत. जगविख्यात आणि सर्वांना माहित असलेल उदाहरण म्हणजे धर्मसंस्था. Judaism वाढत गेला आणि त्याची विभागणी काही शाखांमध्ये झाली, त्यापैकीच एक Christianity ती नंतर दोन मुख्य शाखांमध्ये विभागली गेली Catholic आणि Protestant. Protestant नंतर Baptist, Methodist, Lutheran, आणि बरेच काही मध्ये विभागला गेला. मानवाच्या मूळ स्वभावामध्येच आहे समूहाने वा कळपाने वास्तव्य करणे.

हे वाढत जाणाऱ्या प्रत्येक कळपामध्ये, समूहामध्ये, मोठं मोठ्या Organisation मध्ये घडत आलेला आहे. प्रत्येक नवीन समूह स्वतःच नवीन भाषा आणि Culture विकसित करतो जे समूहातील अंतर्गत संभाशनासाठी मदत करते पण त्यामुळं दोन वेगळ्या समूहात ज्ञानाच्या देवाणघेवाणीसाठी मर्यादा निर्माण करते.

The problem: Each group lives in its own echo chamber, which it believes is the “true” reality, and it fights to maintain this belief by demonizing other groups. And in an age of social media and targeted, personalized content, these echo chambers become even more insular as we’re exposed to less and less information outside our own chosen groups.

 

Info-Apocalypse Problem 3: Constant Distraction

हा सर्वात महत्वाचा आणि ही लेख लिहण्यासाठी प्रेरणा ठरलेला मुद्दा.

Chamath Palihapitiya हे founder आणि CEO आहेत Social Capital चे आणि त्याबरोबरच Facebook चे Senior Executive पण राहिले आहेत.

(मुद्दाम जशाच तसा )
Interviewer: You said that this is a time for soul-searching in social media businesses and you were part of building the largest one. What soul-searching are you doing right now on that?

Chamath Palihapitiya: I feel tremendous guilt … I think we all knew in the back of our minds, even though we feigned this whole line of, “There probably aren’t any really bad unintended consequences.” I think in the back, deep, deep, deep recesses of our minds, we kind of knew something bad could happen.

हे मत आहे फेसबुक चे सिनियर executive चं जे आत्ता आपला बहुमूल्य वेळ Social Media awareness training देण्यात घालवत आहेत

The problem: 
Our physical and virtual environments are surrounded by more and more content — whether editorial, advertising, or “fake news.” This content is marketed specifically to our own inclinations, which proves a powerful distraction that can keep us from pursuing more useful information or our own goals.

 

नक्की प्रॉब्लेम काय आहे?

आत्तापर्यंत नक्की Problem काय आहे हे वरील मुलाखतीवरून लक्षात आलंच असेल.
ज्याप्रमाणे Junk Food Consumption चा आपल्या शरीरावर दुरोगामी दुष्परिणाम होतो त्याच प्रमाणे Junck Content Reading चाही आपल्या वैचारिक आणि sub-conscious mind वर परिणाम होतो.

फेसबुक, इंस्टाग्राम, YouTube आणि WhatsApp इत्यादी सारख्या माध्यमांवर विनाकारण तासंतास घालवला जातो. हे मोठं मोठे Organisation आपलं Behavioural अभ्यास करून आपल्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेऊन आपण ज्यात Intrested आहोत आशेच Content आपल्या समोर जाणीवपूर्वक घेऊन येतात. आपण जे कन्टेन्ट रोज वाचतो पाहतो ते आपल्या decision मेकिंग वर परिणाम करतात आणि जाणीवपूर्वक आपल्या समोर आपण आपल्या X मतावरून/विचारावरून Y मतावर/विचारावंर परिवर्तन घडवून आणणारे लेख व कन्टेन्ट आपल्या समोर प्रेसेंट केले जातात अलीकडेच झालेल्या भरपूर घटना याच ताज उदाहरणे आहेत.

(Note: आपल्या sub – conscious mind वर आणि आपण घेणाऱ्या decision वर  नक्की कसा परिणाम केला जातो हे जाणून घ्यायचं असेल तर Will Smith यांचा Focus हा मूवी नक्की पहा.)


आपल्या वैयक्तिक माहिती आणि इंटरेस्ट चा वापर करून आपल्या समोर जाणीवपूर्वक ठराविक Advertise आणल्या जातात.

शेवटी जेव्हा तुम्ही नवीन शूज किंवा आणखी काही खरेदी केलं असेल फेसबुक, इंस्टाग्राम ची advertise पाहून आणि तुम्हाला वाटत असेल कि ती गोष्ट खरेदी करण्याचा निर्णय तुमचा होता तर तुम्ही खूप मोठ्या संभ्रमात आहेत. तुम्हाला तो निर्णय घेण्यासाठी तुमच्या Psychology बरोबर खेळून तुमच्या साठी हा निर्णय किंवा तुम्हाला हा निर्णय घेण्यासाठी जाणीवपूर्वक मजबूर करण्यात आलेला आहे.(खरं तर विषय खूप गंभीर आणि खोल आहे हे उदाहरण फक्त वरकरणी आणि सोप्प्या भाषेतल आहे)

तासंतास लोकांचे WhatsApp satatus पाहण्यात आणि फेसबुक च्या वायफळ पोस्ट पाहण्यात किंवा स्वतः टाकण्यात कसलाच स्वारस्य नाही. इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक वर आपण घालवत असलेला वेळ आणि त्यामुळं आपल्यात होणार वैचारिक बदल हा संशोधनाचा विषय आहे. त्यावर एका ब्लॉग पोस्ट वर भाष्य करता येणार नाही आणि मी करण्या योग्य हि नाही. अर्थात काही चांगले परिणाम हि आहेत पण ते दुष्परिणामांचा तुलनेने नगण्य आहेत.

पण प्रत्येकाला Social Media वर किती वेळ घालवावा काय पोस्ट करावं आणि काय पोस्ट करू नये, किती पर्सनल मोमेंट्स आणि फोटोस पोस्ट करावे एवढं मूलभूत ज्ञान तरी नक्की असावं असं मला वाटतं. कारण अतिरेकी वापराचे दुष्परिणाम अनन्य साधारण आहेत.

अति कोपता कार्य जाते लयाला ।।
अति नम्रता पात्र होते भयाला ।।
अति काम ते कोणते हि नसावे ।।
प्रमाण मध्ये सर्व काही असावे ।।
प्रमाण मध्ये सर्व काही असावे ।।

शेवटी अति म्हणजे नक्की किती आणि अति झालंय हे ठरवण्याचं एकक प्रत्येकाच वेगवेगळं आहे आणि खरी गोम तिथंच आहे.

 

हा दर्जेदार लेख आवडला असेल तर आपल्या दर्जेदार नातलग आणि मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा…